लग्नाची गाणी - तोलाला कमी झाले
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
तोलाला कमी झाले
फ़ूलं झडे, पाऊस पडे, जयू अंगणात लोटाले
जयूला पैंजण आणा, तिच्या तोलाला कमी झाले
फ़ूलं झडे, पाऊस पडे, जयू अंगणात लोटाले
जयूला बांगड्या आणा, तिच्या तोलाला कमी झाले
फ़ूलं झडे, पाऊस पडे, जयू अंगणात लोटाले
जयूला साडी आणा, तिच्या तोलाला कमी झाले
कमी पडले
फ़ुले झडतात पावसागत, जयू झाडते अंगण सतत
जयूला पैंजण आणा, तिच्या तोलामोलाला कमी पडले
फ़ुले झडतात पावसागत, जयू झाडते अंगण सतत
जयूला बागड्या आणा, तिच्या तोलामोलाला कमी पडले
फ़ुले झडतात पावसागत, जयू झाडते अंगण सतत
जयूला साडी आणा, तिच्या तोलामोलाला कमी पडले
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013

TOP