सावर ग
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा आस ग आस, तुझी आस दोन दिवसांची
रेखा सासू ग सासू तुझी आहे जन्माची
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा बास ग बास, तुझा बास दोन दिवसांच्चा
रेखा सासर ग सासर तुझा आहे जन्माचा
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा भाऊ ग भाऊ, तुझा भाऊ दोन दिवसा्चा
रेखा भावला ग भावला तुझा आहे जन्माचा
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा बहिण ग बहिण, तुझी बहिण दोन दिवसांची
रेखा नंद ग नंद तुझी आहे जन्माची
(आस-आई, बास-वडील, भावला-मोठा दीर, नंद-नणंद, उलटा पदर-गुजराथी पध्द्तीचा पदर)
सावर ग
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा आई ग आई, तुझी आई दोन दिवसांची
रेखा सासू ग सासू तुझी आहे जन्माची
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा बाबा ग बाबा, तुझा बाबा दोन दिवसांचा
रेखा सासर ग सासर तुझा आहे जन्माचा
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा भाऊ ग भाऊ, तुझा भाऊ दोन दिवसांचा
रेखा दीर ग दीर तुझा आहे जन्माचा
रेखा सावर ग सावर, तुझा उलटा पदर वरचेवर
रेखा बहिण ग बहिण, तुझी बहिण दोन दिवसांची
रेखा नणंद ग नणंद तुझी आहे जन्माची