मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
सुगरण

लग्नाची गाणी - सुगरण

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


सुगरण
पाणी पडीतो मिरगावा ग
पाणी करीतो गारागुरी ग
नदी वाहीते खालाखुली ग
असा रामू हिमतीदार ग
त्याने भरील्या बंदकीत गोल्या ग
त्याने मारलं मगीर मासं ग

अशी जयाबाई सुगरण ग
तिने कापीला मोरलीवं ग
तिने भरील्या दुरडी ग
जेवाय वाढला सासर्‍याला ग
जेवाय वाढला भरताराला ग
मास दिलाय भरताराला ग
काटं दिलाय सासर्‍याला ग

सुगरण
पाऊस पडतो मृगाचा ग
पाणी करते गुरगुर ग
नदी वाहते खळखळ ग
असा रामू हिंमती दार ग
त्याने भरल्या बंदुकीत गोळ्या ग
त्याने मारले मगर-मसे ग

अशी जयाबाई सुगरण ग
मासे कापले विळीवर ग
माशांनी भरल्या तोपल्या ग
जेवायला वाढले सासर्‍याला ग
जेवायला वाढले नवर्‍याला ग
मांस दिले नवर्‍याला ग
काटे दिले सासर्‍याला ग

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP