लग्नाची गाणी - तोटा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
तोटा
इंग्रजाचे मुला तुझ्या हाताला काला दोरा
हाताला काला दोरा तुझ्या दारूगोला बंद केला
दारूगोला बंद केला तुझ्या सोडालेमन चालू केला
सोडालेमन चालू केला तुझ्या गरिबाचा तोटा केला
गरिबाचा तोटा तुझ्या मोठे लोकांचा फ़ायदा केला
नुकसान
इंग्रजाच्या मुला तुझ्या हाताला काळा दोरा
तू देशी दारूबंद केली
तू सोडालेमन चालू केले
सोडालेमन चालू करून
तू गरिबांचे नुकसान केले
गरिबांचे नुकसान केले
गरिबांचे नुकसान केलेस आणि
श्रीमंत लोकांचा फ़ायदा केलास...
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP