भानशी हात घालते
भानशी हात घलते, भारजं काय काय काढीते
काढीते फ़ेरव्याजोडं बोटांत भरीते
भानशी हात घलते, भारजं काय काय काढीते
काढीते पट्टयाजोडं पायांत भरीते
भानशी हात घलते, भारजं काय काय काढीते
काढीते बांगड्याजोडं हातांत भरीते
भानशी हात घलते, भारजं काय काय काढीते
काढीते चुलबंदजोडं दंडात भरीते
भानशी हात घलते, भारजं काय काय काढीते
काढीते ती गरसोल, गल्यात भरीते
(भानस-चूल, भारजा-बायको, फ़ेरवं-जोडवी, पट्टया-पैंजण, चुलबंद-बाजूबंद, गरसोल-गळेसर/मंगलसूत्र)
चुलीजवळ हात घालते
चुलीजवळ हात घालते, नवरी काय काय काढते
काढते जोडव्यांचा तोड, पायांच्या बोटांत घालते
चुलीजवळ हात घालते, नवरी काय काय काढते
काढते पैंजणांचे जोड, पायांत घालते
चुलीजवळ हात घालते, नवरी काय काय काढते
काढते बांगड्यांचे जोड, हातांत घालते
चुलीजवळ हात घालते, नवरी काय काय काढते
काढते बाजूबंद जोड, दंडत घालते
चुलीजवळ हात घालते, नवरी काय काय काढते
काढते ती मंगळसूत्र, गळ्यात घालते
(चुलीजवळ पाच तांबे एकावर एक ठेवलेले असतात. त्या प्रत्येकात एक सौभाग्यनिदर्शक अलंकार असतो. ही उतरंड पडू न देता प्रत्येकातील वस्तू काढून नवरी नवरी तो एकेक तांब्या सासूजवळ देते व त्यातील अलंकार आपल्या अंगावर चढवते.)