लग्नाची गाणी - गुलाबाचा फ़ूल
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गुलाबाचा फ़ूल
वसईच्या मालावरी बाग लावलाय गुलाबाचा
बाग लावलाय गुलाबाचा, फ़ूल फ़ूललाय मखमलीचा
तेही ग फ़ूलावरी जगनबाल डोलं मोडी
डोलं का मोडूनी फ़ूल का उडवीला
फ़ूल का उडवूनी मंडप उभा केला
मंडपी उभा केला, सोभी आली मंडपाला
गुलाबाचे फ़ूल
वसईच्या माळावर बाग लावलीये गुलाबांची
बाग लावलीये गुलाबांची, फ़ूल फ़ुललेत मखमलीचे
त्याच ग फ़ुलावर जगनबाळ मोडतोय डोळे
असे डोळे मोडूनी फ़ूल त्याने खुडले
असे फ़ूल खुडूनी मंडपी उभे केले
मंडपी उभे केले, शोभा आली मंडपाला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP