लग्नाची गाणी - वनवास
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वनवास
पारा पोपट जंगलात ग
माझे बापाने दिली दूरी,
लेक दिलीय कोकणात ग...
तिला कशाचा वनवास
साड्या-चोल्याचा वनवास...
पारा पोपट जंगलात ग
माझे बापाने दिली दूरी,
लेक दिलीय कोकणात ग...
तिला कशाचा वनवास
गाठी-बांगड्याचा वनवास...
(वनवास-इथे ’अभावाच त्रास’ या अर्थाने.)
वनवास
हिरव्या पोपटी जंगलात ग
माझ्या बापाने दिलेय दूरवर ग
लेक दिलीय कोकणात ग
तिला कशाचा वनवास
साड्या-चोळ्यांचा वनवास....
वनवास
हिरव्या पोपटी जंगलात ग
माझ्या बापाने दिलेय दूरवर ग
लेक दिलीय कोकणात ग
तिला कशाचा वनवास
गळेसर-बांगड्याचा वनवास...
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP