लग्नाची गाणी - वांझोटी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वांझोटी
उंच डोंगराला ग सगुण्बाई
वनची उभळली ग सगुणबाई
वनची शेवाळावं बायको पळवली
वांझोटी झालो मी बाये...
वांझोटीचे पोटी मुलगा जनमला
लोव्हण्यात घातला ये s
घडघडा बोलीला ये s
फ़डफ़डा मारीला ये s
वांझोटी
उंच डोंगरावर ग सगुणबाई
झाड पेटल्या-विझल्यागत दिसते ग सगुणबाई
शेवाळागत निसरड्या मनाच्या नवर्याने दुपारी बायको
आणली
मला वांझोटी ठरवली...ग बाई...
मात्र वांझोटी च्याच पोटी मुलगा जन्माला
लिहिणं शिकावं म्हणून त्याला शाळेत घातला
(मुलगा झाला तरी मला आता मी वांझोटीच वाटते
कारण शिकूनसवरून)
तो मला उलटून बोलतो
आणि फ़ाडफ़ाड मारतो देखील....
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP