लग्नाची गाणी - सवय
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सवय
भात रांधलाय तवल्यात
सासू भांडते भांडते भांडते
सासू नाही मी नांदायची
आता कशी मी चालायची
शेंडी नवर्याला बांधायची
तरी तुजला नांदवायची
गाडी चालली घुंगराची
मला सवय बंदराची
सवय
मी केवळ तवलीभर भात शिजवला
तो एवढासा हात पाहून सासू भांडू लागली
-सासूबाइ तुमच्याजवळ मी राहणार नाही
मी माझ्या माहेरी निघून जाईन
-तुला वेणीने नवर्याशी बांधुन ठेवीन
काही करून तुला नांदायला लावीन
घुंगराची गाडी डोंगराळ भागातून
हिंदकळत जातेय
मला सपाट प्रवेशाची-बंदराची
सवय आहे....
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP