लग्नाची गाणी - मी काय खाऊ?
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मी काय खाऊ?
लोकांची पोरां हुंबाजांबा खाती
मी काय खाऊ टिवरीच्या कल्या रं बापा?
लोकांची पोरां भोकर टेंबर खाती
मी काय खाऊ वांदरीची फ़लां रं बापा?
(वांदरी-खाडीकिनारी उगवणारे झुडूप, त्याची फ़ळे विषारी असतात.)
मी काय खाऊ?
लोकांनी आपल्या मुली दिल्यात आपल्याच
भागात, तू मात्र मला दूर खाडी किनारी दिलेस)
त्या मुली जंगलात हुंबाजांबाची फ़ळे खातात
खाडी किनारी मात्र नुस्ती टिवरीची झुडूपे असतात
त्या मुली जंगलात भोकरे टेंबरे खातात
मी काय वांदरीची विषारी फ़ळे खाऊ?
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP