लग्नाची गाणी - चढाची गाणी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
लग्नातील चढाची गाणी
१. आंबू जांबूचा पाला ग मेव्हणे
नवरा तुझा काला...
-असू दे कालाबेला रं भावो
पत्करून गेला....
२. वाटंवरला काकड ग मेव्हणे
नवरा तुझा माकड....
-असू दे माकडबिकड रं भावो
मला तो पत्करला....
३. वाकरला गवर न् काढली पिवर
रं भावो तुझे जीवासाठी
-न् रोगानची कोंबडी मी कापली
ग मेव्हणे तुझे जीवनसाठी
४. पोर्या तू किती उडशी रं किती उडशी
पेजंचे नांदीत बुडशी
-पोरी तुझ्या सेंड्याला ग टाचणी
तुला नवरा मिल्लाय नाचणी
५. वरव्याचा ताना कोमला ग
राजूबाय भाजीचा ताल गेला
-शेगटाचा पाला कोमला रं
बाजंवाल्या बाज्याचा ताल गेला
६. नवरीदारी सामबोर, त्यावं बोरांच नाय
आल्या नवरीच्या करवल्या, त्यांना पोरांच नाय
७. नवरीदारी शेलूट, त्यावं शेलटाच नाय
आल्या नवरीच्या करवल्या, त्यांना बेंबटाच नाय
७. ये दारी कुटला उडीद
तं ते दारी उडली मुशी
नवरीचे करवल्यांची
कालीच मुशी
९. करंदीचा करंस काला, पाना पांढरा
नवरीचा वर्हाड घालला हडप्यात
मारला ताला
बारा वं दोन वाजता उघडला ताला
लग्नातील चढाची गाणी
१. आंब्या-जंभळाचा पाला ग मेव्हणे
नवरा तुझा काळा....
-असू दे काळा तर काळा रे भाऊ
मी त्याचा स्वीकार केला....
२. वाटेवरचा काकड ग मेव्हणे
नवरातुझा माकड
-असु दे माकडबिकड रे भाऊ
त्याने माझा स्वीकार केला
३. उकरले गटार न् काढली ’पिवर’ (दारू)
रे भावजी तुझ्या जीवासाठी
-मी तर रोगट कोंबडी कापली
ग मेव्हणे तुझ्या जीवासाठी
४. पोरा, तू नाचताना दे किती उडशील
पेजेच्या पाण्यात बुडशील....
-पोरी, तुझ्या अंबाड्याला ग ताचणी
तुला नवरा मिळालाय नाचरा
५. वारव्याचा वेल कोमेजला ग
राजूबाई, भाजीला ताल गेला
शेगटाचा पाला कोमेजला रे
बाजेवाल्या, बाजाचा ताल गेला
६. नवरीच्या दारात सामबोर, तीवर बोरेच नाहीत
आल्या नवरीच्या करवल्या,त्यांना पोरेच नाहीत
७. नवरीच्या दारात शेलूट, त्यावर शेलटेच नाहीत
आल्या नवरीच्या करवल्या, त्यांना बेंबीच नाही
८. या दारात कुटला उडीद
तर त्या दारी उडाला भूसा
नवरीच्या करवल्यांना
काळ्या काळ्या मिशा
९. करवंदीचे करवंद काळे, पान पांढरे
नवरीचे वर्हाड घातलेपेटार्यात
लावलेकुलूप
बारा वर दोन वाजता उघडलेकुलूप
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP