समारातू
गोणी भरल्या चावूलांच्या, चावूलांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, चावूलांच्या ग
गोणी भरल्या दालीच्या, दालीच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, दालीच्या ग
गोणी भरल्या नारलाच्या, नारलाच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, नारलाच्या ग
गोणी भरल्या हलदीच्या, हलदीच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, हलदीच्या ग
गोणी भरल्या खारकांच्या, खारकांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, खारकंच्या ग
गोणी भरल्या बदामांच्या, बदामांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, बदामांच्या ग
गोणी भरल्या सोपार्यांच्या, सोपार्यांच्या ग
नेऊन टाकल्या टाकल्या, नवरीदारी ग
असा सासरा समरातू, समरातू ग
गोणी धाडल्या धाडल्या, सोपार्यांच्या ग
(समरातू-सम्राट, चावूल-तांदूळ, धाडणे-पाठवणे)
सम्राट
पोती भरली तांदूळाची, तांदूळाची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने तांदूळाची ग
पोती भरली डाळीची, डाळीची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने डाळीची ग
पोती भरली नारळांची, नारळांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने नारळांची ग
पोती भरली हळकुंडांची, हळकुंडांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने हळकुंडांची ग
पोती भरली खारकांची, खारकांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने खारकांची ग
पोती भरली बादामांची, बादामांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने बादामांची ग
पोती भरली सुपार्यांची, सुपार्यांची ग
नेऊन टाकली देजापायी, नवरीदारी ग
असा सासरा आहे सम्राट ग
पोती पाठवली त्याने सुपार्यांची ग
(लग्नात नवर्यामुलाकंडून नवरीला ’देज’ (हुंडा) द्यावा लागतो. त्यात तांदूळ, डाळ, नारळ, हळद,खारीक, बदाम व सुपारी अशा वस्तू देतात.)