लग्नाची गाणी - धास्ती
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
धास्ती
पोरी भाजी कर गं चनावाटान्याची
चनावाटान्याची,गोल गोल टांबेत्यांची
पोरी सासर्याला वाढ गं जास्ती
बापाची करू नको धास्ती
पोरी सासूला वाढ गं जास्ती
आईची करू नको धास्ती
पोरी दिराला वाढ गं जास्ती
भावाची करू नको धास्ती
पोरी नंदेला वाढ गं जास्ती
बहिणीची करू नको धास्ती
काळजी
पोरी भाजी कर ग चण्यावाटाण्यांची
चण्यावाटाण्यांची, गोल गोल टमाट्यांची
पोरी, सासर्याला वाढ गं जास्ती
करू नको बापाची काळजी...
पोरी, सासूला वाढ गं जास्ती
करू नको आईची काळजी...
पोरी, दिराला वाढ गं जास्ती
करू नको भावाची काळजी...
पोरी, नणंदेला वाढ गं जास्ती
करू नको बहिणीची काळजी...
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP