मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
सोन्यापाखरू

लग्नाची गाणी - सोन्यापाखरू

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


सोन्यापाखरू
नवर्‍यादारी सावर फ़ुलं, नवर्‍यादारी सावर फ़ुलं
त्यावं आला सोन्यापाखरू, त्यावं आला सोन्यापाखरू
फ़ुला चुखं किरळ्या करं, फ़िला चेखं किरळ्या करं

तंथून पाखरानं उडान घितले
जाऊन पडला खळ्यामेरं
नखी वाकरं टोंकी चरं

तंथून पाखरानं उडान घितले
जाऊन पडला दरयामेरं
पाखरू बोलं, पाखरू बोलं-एके घोटी घोटील तुला!
दरया बोलं, दरया बोलं-एके हलपी बेडवील तुला!
(किरळ्या करणे- शीळ घालणे, वाकरणे-उकरणे, मेरे-काठ, हलपी-लाटेत)

सोनेरी पाखरू
नवर्‍यादारी सावर फ़ुलते, नवर्‍यादारी सावर फ़ुलते
सावरीवर आले सोनेरी पाखरू, सोनेरी पाखरू
चोखे फ़ुलांतील मध आणिक शीळ घालते

तिथून पाखरू उडून गेले
जाऊन बसले खळ्यापुढे
नखाने उकरते, चोचीने चरते

तिथून पाखरू उडून गेले
जाऊन बसले दर्यापुढे
पाखरू बोले, पाखरू बोले-एका घोटात प्राशीन तुला
दर्या बोले, दर्या बोले- एका लाटेत बुडवीन तुला!

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP