लग्नाची गाणी - सासर्याची पोर
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सासर्याची पोर
तला खणिला चौकोनी चौरस
जावाय मांगतो हाताचा घड्याल
जावायला दिला हाताचा घड्याल
तरी नाय बोले जायाचे म्हन्ये
तला खणिला चौकोनी चौरस
जावाय मांगतो कपड्याचे जोड
जावायला दिला कपड्याचे जोड
तरी नाय बोले जायाचे म्हन्ये
तला खणिला चौकोनी चौरस
जावाय मांगतो सासर्याची पोर
जावायला दिली सासर्याची पोर
तेव्हा तो बोले जायाचे म्हन्ये
(तला-तळे)
सासर्याची लेक
तळे खणले चौकोनी चौरस
जावई मागतो हातीचे घड्याळ
जावयाला दिले हातीचे घड्याळ
तरी तो काही जाण्याचे बोलेना
तळे खणले चौकोनी चौरस
जावई मागतो कपड्यांचा जोड
जावयाला दिला हातीचे घड्याळ
तरी तो काही जाण्याचे बोलेना
तळे खणले चौकोनी चौरस
जावई मागतो सासर्याची लेक
जावयाला दि्ली सासर्याची लेक
तेव्हा कुठे तो परत जाईन म्हणतो!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP