मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
लाड

लग्नाची गाणी - लाड

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


लाड
बारीक पोवला मोत्यानं ओवला
आमची नवरी लहान ग
हलूहलू हलद लावा
तिचे आईनी केले लाड ग

बारीक पोवला मोत्यानं ओवला
आमची नवरी लहान ग
हलूहलू पाय चोला
तिचे बापानी केले लाड ग

बारीक पोवला मोत्यानं ओवला
आमची नवरी लहान ग
हलूहलू ठेस भरा
तिचे भावांनी केले लाड ग
(ठेस भरणे-तादूळ हातात घेऊन नवरीच्या पाऊल-गुडघा असे नेत नेत तिच्या मागे टाकणे.)

लाड
बारीक पोवळा मोत्यासोबत ओवला
आमची नवरी लहान ग
हळूहळू हळद लावा
तिचे आईने केले लाड ग

बारीक पोवळा मोत्यासोबत ओवला
आमची नवरी लहान ग
हळूहळू पाय चोळा
तिचे बापाने केले लाड ग

बारीक पोवळा मोत्यासोबत ओवला
आमची नवरी लहान ग
हळूहळू ’ठेस’ भरा
तिचे भावांनी केले लाड ग

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP