स्त्रीगीत - अभिनंदन
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आज सखे ग तव अभिनंदन
दोन जिवांचे हे चिरमीलन ॥धृ॥
मृदुल फुलांची ही वरमाला
करी शोभते तुझ्या आजला
अर्पिलीस तूं पतिदेवाला
आनंदाचा आहे हा क्षण ॥१॥
इच्छित तव अजि सफल जाहले
मोदभराने मानस डोले
आनंदाश्रू नयनी दाटले
पुलकित झाला देहाचा कण ॥२॥
जीरनांतले पर्व नवे हे
कौशल्याने तूं सजवावे
माप यशाचे पदरी पडावे
फुलव सुखाचे तूं नंदनवन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP