स्त्रीगीत - गाणे कृष्ण जन्माचे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
श्रावण अष्टमी दाटला काळोख
काळोख दाही दिशांत
सखे । ग जन्मले श्रीकृष्ण नाथ ॥धृ॥
बिजलीची आरास मेघांची सनई
खळखळ वाहे श्री यमुनामाई
प्रसूत देवकी ऎशा या समयी
सार्थकी लागली रात ॥१॥
क्षणभर पाहिले आपुल्याबाळा
मग म्हणे वासुदेवा लौकरी उचला
पोचवा सुस्थळी गोकुळी याला
पोचवा नंद गृहांत ॥२॥
पांगली यमुना जाहली वाट
त्वरेने वसुदेव गोकुळी येत
प्रभात काळी एकचि मात
यशोदेसी पुत्र हो प्राप्त ॥३॥
संपला काळोख संपले दैन्य
गोकुळी आले कृष्ण भूषण
जोजविती त्यास कौतुके करुन
प्रेमाने अंगाई गात ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP