स्त्रीगीत - वास्तु समारंभ
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
सदन हे होवो भाग्याचे
फुलवित जीवन सौख्याचे ॥धृ॥
तोरण दारी, पुढती गणेश
सुंदर वास्तु सूर्य प्रकाश
सुदिन ह्या निवासात साचे ॥१॥
येवोत घरी आप्तस्वकीय
गृहस्थाश्रमी तेचि श्रेय
प्रेममय जीवित विभवाचे ॥२॥
पुष्टी तुष्टी गृहात नांदो
सौजन्याने सुयशहि वाढो
पाठीशी आशिष थोरांचे ॥३॥
मनी योजिला किती दिसांचा
पुरला हेतु ऎसा तुमचा
चिंतिते अभिष्ट सकलांचे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP