स्त्रीगीत - मुलीचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
निजविते तुला जोजविते
तुला लाडके अंगाई गाते ॥धृ॥
तूं आमुच्या घरची कन्या
लक्ष्मी स्वरुप तूं मान्या
रुपा गुणाचे वैभव मॊठे ॥१॥
स्नेहाचे नवे हे पाश
देवोत सकळोका यश
तुला पाहुन प्रेमाचे भरते ॥२॥
तुझ्या रुपाने येवो सुखशांती
समृध्दि तशी सत्किर्ती
तुझ्या जन्माचे कौतुक वाटे ॥३॥
तुजवरी कृपा ईशाची
राहु दे तशी स्वजनांची
आशिर्वादाने मोल हे मोठे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP