स्त्रीगीत - रामाचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
हलविते पाळणा माता कौसल्या
जो जो रे रामराया, जो जो रे रामराया ॥धृ॥
सुकुमार देहाची श्यामल कांती
नेत्रांत शोभती तेजाच्या ज्योती
आनंद मायेना माझी ये चित्ती
लिंबलोण या ग या ग उतराया ॥१॥
नटुनि सजुनि आल्या ह्या नारी
उंची अहेरांच्या आणिल्या परी
पाहुनि घ्यावी कलाकुसरी
कौतुकांत न्हाली इवलीशी काया ॥२॥
कुणि घ्या हा राम राम मनोहर
सदैव घाला प्रेमाची पाखर
वाढेल दिसमासा त्रैलोक्यसुंदर
सोत्सुक पाहते माऊलीची माया ॥३॥
धन्य ही अयोध्या धन्य सूर्यवंश
जन्मला जेथे स्वयेच ईध
भाग्य कौसल्येचे अहो विशेष
घेई अवतार दुष्टासी दंडाया ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP