स्त्रीगीत - पाळणा मुलाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
निज रे आता निज वेल्हाळा
झोके देते तान्ह्या बाळा ॥धृ॥
रंगित पाळणा गादी शेवरीची
आंथरली वर चादर फुलांची
तुला पांघराया रेशमी हा शेला ॥१॥
देवस्वरूप हे बालरूप तव
ब्रह्मानंदी खेळे जीव
तुला पाहुनिया जीव सुखावला ॥२॥
पाळण्यात घे झोप सुखाने
हांस, खेळ आणि स्वच्छंदाने
घरी दारी झाला तुझाच रे चाळा ॥३॥
बाळकडू देते शक्तिचे बुध्दिचे
भाग्यवंत बाळ स्वप्न हे उद्याचे
तुझ्या कर्तुत्वाचे भूषण आईला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP