मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
नव्या सुनेचे स्वागत

स्त्रीगीत - नव्या सुनेचे स्वागत

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


आज सोनियाचा क्षण । दारी लाविले तोरण
गृहस्वामिनी घरासी । आज येणार म्हणून ॥१॥
घरदार हे सजले । सज्ज सारे स्वागताला
ये ग निर्मल मनाने । आपुल्याच सदनाला ॥२॥
सुख सौभाग्य वैभव । येइ सौजन्या मागून
सौजन्याचा थोर वसा । ठेव मनी जोपासून ॥३॥
आधी देता थोडे फार । देव देतसे अपार
यांजसाठी संस्कारांचा । थोर करिती आदर ॥४॥
तुज संस्कारांची ठेव । दिली माय पितयाने
नांद आपुल्या गृहांत । गात आनंदाचे गाणे ॥५॥
आशिर्वादाच्या अक्षता । जणुं शब्द सदिच्छेचे
ऐशा मंगल समयी । अभिष्ट मी चिंतायाचे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 21, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP