स्त्रीगीत - मुलीचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
तुज डोलविते, तुज हालविते
छकुले सोनुले लडिवाळे
तुझ्यामुळे ह्या घरी आमुच्या
फुलले ग हर्षमळे ॥धृ॥
आयुष्याची नवी उभारी
उल्हासाची नांदी ठरावी
वस्त्राभरणे सुबक घालिता निवताती मम डोळे ॥१॥
हौशी आजी बहुत सुखावे
आत्यांनी कौतुक करावे
आनंदाचे दारी घरी ग होताती सुख सोहळे ॥२॥
गुलाब कलिका तुजसी म्हणूं का
आकाशाची जणु तारका
जीवनातली सुवर्ण घटिका अमृत वा सिंचियले ॥३॥
हुशार हसरी होई बाळे
तूं उजळावी दोन्हीहि कुळे
प्रसन्न, खुलवी स्मिता फुलली ग चित्कमळे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP