स्त्रीगीत - पाळणा मुलाचा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आमचा छोटासा गोरा गोरा भाऊ
आम्ही बाळाला झोके देऊ ॥धृ॥
बाळ गोजिरवाणा
लाडका हा तान्हा
आम्ही बाळाला अंगाई गाऊ ॥१॥
कृष्ण नंदा घरी
बाळ आमुच्या घरी
आम्ही मोदात गाणी गाऊ ॥२॥
पाळणा रंगीत हा
सजविला पहा
आंबे पानांचे तोरण लावू ॥३॥
भालावरी तीट
काजळाचे बोट
त्याच्या हातांत खुळखुळा देऊ ॥४॥
बाळ भाग्यशाली
आई आनंदली
आता बारशाचे पेढे खाऊ ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP