स्त्रीगीत - वास्तुशांतीचे गीत
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
सदन
चिरयत्नांचे लेणे सुंदर आज मुर्त जाहले
सदन हे ऎश्वर्ये शोभले ॥धृ॥
वास्तुदेवता उदार व्यापक
सर्वत्रांनो होवो साह्यक
शांती सुखाला सद्भावाला स्थान इथे लाभले ॥१॥
इथे सुजनता सदैव नांदो
समृध्दिचे सूर निनादो
स्वागत करण्या आप्त जनांचे द्वार सिध्द राहिले ॥२॥
आश्रय लाभो लहान थोरा
शुध्द मोकळा वाहो वारा
प्रसन्न जीवन कृतार्थतेने आज जणु सजले ॥३॥
आनंदाचा गमला हा क्षण
उत्साहाचे लावूं तोरण
थोरजनांच्या पुण्याईचे प्रतिक मज भासले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP