स्त्रीगीत - मुंजीचं गाणं
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
थाट सारा बघुन हरीश गेला खुलुन
आला मुंजीचा क्षण बघा ऎसा नटुन ॥धृ॥
दारी मांडवाला । तोरण लारूं चला
जाऊ अक्षतील आता सार्या मिळुन ॥१॥
व्रतबंध आज । केला सर्व साज
गुरुगृही जाहो आता पंचा नेसुन ॥२॥
यज्ञोपविताचे । मोल मोठे साचे
लागा अभ्यासाल आता दीक्षा घेउन ॥३॥
मामी आत्या आली । मंजु करवली
निरु मोठ्या खुषीत गाते गानी करुन ॥४॥
उरक आईस मोठा । नाही कशास तोटा
केले कार्य मोठे थोडे थोडे म्हणुन ॥५॥
आजी दोघी हजर । पंजी मोठी तप्तर
करती आटापिटा अंगी शक्ति नसुन ॥६॥
बाबा चष्म्या आडुन । पाहती गंमत दुरुन
घातला सारा घाट किंचित गालांत हसुन॥७॥
शुध्द विचारांची । जाण संस्कारांची
नव्या रोपाचा वृक्ष उद्या होइल म्हणून ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP