स्त्रीगीत - मंगलाष्टके
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
श्रीमन्मंगलदायका गजमुखा आधी तुम्हा वंदिते
यावे हे शुभकार्य सिध्द करण्या एसेची मी प्रार्थिते
अंबे ! श्री कुलदेवते ! सकलहि देवांसी ये घेउनी
आहे आज विवाह श्री तुलसीचा कुर्यात् सदा मंगलम् ॥१॥
कार्तिकातिल शुध्द द्वादशी तिथी आहेच की योजिली
ऎशा ह्या शुभपर्वणीस सगळी ही सिध्दता जाहली
इक्षुमंडप हा अहा खुलतसे वृंदावनाच्या वरी
माला सुंदर झेंडुची दिसतसे तुलसी वधुच्या करी ॥२॥
सारे अंगण हे अहा ! सजविले रेखून रंगवल्या
सस्नेहे सगळीकडे आम्ही तशा ह्या दिपीका लाविल्या
टाकूं मंगल अक्षता सकलहि तुलसी हरीच्या वरी
सारे मंगल होऊ दे यदुपते ! कुर्यात् सदा मंगलम् ॥३॥
श्रीकृष्णा प्रिय जी असे अतिव ती तुलसी सखी श्यामल
प्रेमाने पुजिता तिला प्रतिदिनी होई सदा मंगल
शांती-तृप्ति सदा गृहांत विलसो आनंद ह्या जीवनी
देई आशिष सर्वदे ! भगवति ! कुर्यात् सदा मंगलम् ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP