स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
परम हा भाग्याचा सोहळा
करित तव आज कौतुकाला ॥धृ॥
फुलायची वंशाची वेल
उमलायाचे नवीन फूल
हर्ष बहु सकला ॥१॥
वनराणी परी हिरवा साज
खुलून दिसते तुजसी आज
वानूं किती वसनाला ॥२॥
नवगर्भाचे तेज मुखावर
मनांत उसळे तो सुखसागर
भुषवी सकलाला ॥३॥
करुं या औक्षण, उतरू दृष्ट
होवो तुजसी सद्गुणी पुत्र
आशिर्वचनाला
देते आशिर्वचनाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP