स्त्रीगीत - विवाह मंगल
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आनंदाच्या मधुलहरीनी नटला मीलनक्षण
सुखमय होवो नवजीवन ॥धृ॥
अर्थ मिळाला जणुं शब्दाला
भाव मिळालां जणुं कार्याला
तैसे तुमच्या सहवासाला
मांगल्याचे सौभाग्याचे लाभो चिरंजीवन ॥१॥
दुग्ध शर्करा योग म्हणुंका
मणि-कांचन हा सुयोग बरवा
जोडा 'अल्का-उदय' असा हा
परस्परांच्या सभ्दग्याने आला येथ जुळून ॥२॥
पति पत्नींच्या विश्वासाने
प्रीतीने फुलणार चांदणे
विहरा दोघे स्वच्छंदाने
शुभ समयी या आशिष देते अभिष्ट तव चिंतुन ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP