मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते|
पाळणा मुलाचा

स्त्रीगीत - पाळणा मुलाचा

मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


हा तुझा नवा अंकूर
बहरू दे सुखे सुंदर ॥धृ॥
ह्यासवे नवे अधिराज्य
नव्या राजाचा नविन साज
पालवी नवी फुलणार ॥१॥
उगवता सुवर्ण पहाट
तेजाचा घेउनि स्त्रोत
पुलकित सर्व स्थिरचर ॥२॥
हा नवा पाहुणा बाई
नवतेची फिरविल दवाही
थोरास मिळो आधार ॥३॥
हा सुलक्षणी सत्पुत्र
वाढवो जगी कुळगोत्र
जणुं हर्षाचा संभार ॥४॥
हा वंशाचा ग दीप
राहुं दे सदा सुखरुप
भाग्याचा वारसदार ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP