स्त्रीगीत - डोहाळे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
पुरवीन तुझे डोहाळे
करुनिया सर्व सोहाळे ॥धृ॥
स्त्रीजन्माच्या परमसुखाची
फलश्रुती ही मंगल साची
वृध्दि होई वंशतरुची
हेची शुभ गमले ॥१॥
पहिल्याचा गे अपूर्व महिमा
कोड कौतुका नाही सीमा
सौभाग्याचा खुले चंद्रमा
मोदे मानस डोले ॥२॥
काय हवेसे तुला वाटते
नकोस लाजूं सांगाया ते
परोपरीची भरली ताटे
आणिली सुरस फळे ॥३॥
हिरवा शालू शोभे सुंदर
साज फुलांचा रूचिर तयावर
सुगंधित हे लावुनि अत्तर
तुजला तोषविले ॥४॥
नव्या पिढिचा नवा पाहुणा
उद्या अंगणी हसेल तान्हा
म्हणती आणवा नवा पाळणा
निजवाया सोनुले ॥५॥
थोर जनांना करुनि वंदन
शुभ आशिष घे त्यांचे मागून
प्रफुल्लीत हे होवो जीवन
प्रभुच्या पाठबळे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 21, 2012
TOP