स्त्रीगीत - मुलीचा पाळणा
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
लाडके तुला निजविते
अंगाई गीत मी गाते ॥धृ॥
तूं कन्या मम भाग्यवती
करी मनोरथांची पूर्ती
वाढवी कुलाची कीर्ती
पाळण्यास झोके देते ॥१॥
फुलणारे काव्य उद्याचे
उज्वल तूं स्वप्न मनीचे
साकार रुप सुयशाचे
तू स्नेहबंध सकलाते ॥२॥
ह्या सुभग सोहळ्यासाठी
उत्कंठित सारे होती
मातेची थोरवी जगती
मी स्वर्गसुख अनुभवते ॥३॥
आशेची तूं फुलवात
घर अवघे ये उजळते
रंगू दे जीवन गीत
प्रभुपदी हेचि विनविते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP