स्त्रीगीत - गाणे कृष्णजन्माचे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
मध्यरात्र काळोखी वद्य अष्टमी तिथी
मथुरेला कृष्णनाथ आज सखे । जन्मती ॥धृ॥
कारागृह कंसाचे लखलखले त्या क्षणी
वाटुनि ये मोद अतिव देवकीच्या लोचनी
जगन्नाथ अंकावर घेई देवकी सती ॥१॥
बालरूप पाहुनिया वसुदेवहि हर्षला
पाटीमध्ये बाळकृष्ण ममतेने निजविला
देववाणी होई त्वरित गोकुळी न्या श्रीपती ॥२॥
माथ्यावर घेउनिया चाले वसुदेव पुढे
यमुना मी ओघवती पाहुनिय चरण अडे ॥३॥
चाल :-
मी कालिंदी श्रीकृष्णाची श्यामल वत्सल कांता ।
चरण चुराया लगबग तिथवर धावत गेले असता ॥
पदस्पर्शाने मोहित झाले नजर वळे खालती ।
मामंजी वसुदेव पाहुनि लाजुनि गेले पुरती ॥
आली तैसी त्याच पाउली माघारी सखी वळले ।
बाई गौळणी काय सांगु तुज वृत्त असे तै घडले॥
लोक समजती श्रीकृष्णांनी अघटित ऎसे केले ।
की यमुनेचे जीवन तत्क्षणी वाहुनिया गेले ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP