स्त्रीगीत - सुवर्ण पुष्पे
मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
तीन पिढ्यांची ही पुण्याई आज सफल झाली
सुवर्ण पुष्पे आम्ही वाहिली ॥धृ॥
पणतु पाहणे भाग्य पणजाचे
मिरवी पणजी कौतुक त्याचे
नेत्र सुखावली आजी-आज्याचे
सर्व सोहळा पाहत असता माता आनंदली ॥१॥
दुर्लभ जगी हा सुवर्ण योग
तो बघण्याचा आमुचे भाग्य
त्याच प्रभुने भरले रंग
आयुष्याची सुरेख सजली ऎशी रंगावली ॥२॥
बाळा तुज कुसुमांची शय्या
ममतेच्या कोशात वाढ या
सामर्थ्याने सामोरा जा
जीवन स्पर्धा जिंकायाची जिद्द मनात हवी ॥३॥
आशिर्वच हे नव्या शिशुला
नव मातेला नव्या पित्याला
आजी-आजा आणि पणजीला
शुभेच्छाहि दिधली ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 22, 2012
TOP