ज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ६ वें.
गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा ।
गुरुविण देव नाहीं दुजा । देव पाहतां त्रैलोकीं. ॥ध्रुवपद.॥
गुरु सुखाचा सागर । गुरु प्रेमाचे आगर ।
गुरु धैर्याचा डोंगर । कदाकाळीं डळमळेना. ॥गुरु०॥१॥
गुरु साधकाची साय । गुरु संतांलागीं माय ।
गुरु कामधेनु गाय । भक्तांलागीं दूभतसे. ॥गुरु०॥२॥
गुरु घाली ज्ञानांजन । गुरु दाखवी निजधन ।
गुरु सौभाग्य देऊन । स्वात्मबोधें नांदवी. ॥गुरु०॥३॥
गुरु मुक्तीचें मंडन । गुरु शिष्यांसी दंडन ।
गुरु पापाचें खंडन । नानापरी करीतसे. ॥गुरु०॥४॥
गुरु वैराग्याचें मूळ । गुरु परमात्मा केवळ ।
गुरु सोडवी तत्काळ । गांठ लिंगदेहाची. ॥गुरु०॥५॥
कायाकासी गुरुपदेंसीं । तारक ब्रम्हा दे आम्हांसी ।
बाप रुक्मादेवीवर । विठठलध्यान मानसीं. ॥गुरु०॥६॥
पद ७ वें.
तैसा जाणा सर्वेश्वरू । न म्हणावा सान थोरू ।
स्वरूपाचा निर्धारू । कवण जाणे. ॥ध्रुवपद.॥
मलिया न शितळू । पालवीतां नये गाळू ।
सुमनांचा परिमळू । गुंफितां नये. ॥तैसा०॥१॥
कापुरा ती काढणी । काढूं नये अडकणी ।
साखरेचें गोडपण । पाखडतां नये. ॥तैसा०॥२॥
मोतीयाचें पाणी । भरितां नये रांजणीं ।
गगनासी गवसणी । घालितां नये. ॥तैसा०॥३॥
डोळियांतील बाहुली । काढिताम नये वेगळी ।
सखी म्हणोनी अंधुळी । धरितां नये ॥तैसा० ॥४॥
विठ्ठलरुविमणीभांड्णीं । कोण करी बुझावणी ।
अखंड च्ररणी । ज्ञानदेव. ॥तैसा०॥५॥
पद ८ वें.
निरखित निरखित गेलियें । मन तन्मय होउनी ठेलियें ॥धुवपद.॥
परब्रम्हाची सर्वहि आटलें । रूप येउनि डोळां बैसलें. ॥१॥
बाप रखुमादेवीवर विठ्ठलें । मूस ओतुनि मेण सांडिलें ॥२॥
पद ९ वें.
गुरगम्य नेणशी साधु म्हणविशी अपणा रे ! ।
नेणशी आत्मारम बोल ठेविशी कविजना रे ! ॥धुवपद.॥
मृगजलाचे डोहीं मोट बाश्यांची बुडविली रे ! ।
गगनाचे पोकळीं वांझ पुर प्रसविली रे ! ।
छाया सांगे वार्ता नेत्रीं बाहुली हांसली रे ! ।
जो जाणे अनुभव धन्य त्याची माउली रे ! ॥गुरुगम्य०॥१॥
रिंगणीचे ढोलीं हस्ती गुंडाळिला होता ।
सेंडा एक मुंगी तीन्ही लोक तीच्या माथां ।
उदकामाजी अंगारा तो म्याम देखिला जळता ।
सांग रे ! गुरुपुत्रा ! तेथील कैशी हे अवस्था रे ! ॥गुरुगम्य०॥२॥
सससमुद्र एक्या टिटवीनें धरिले रे ! ।
पुढें नवल वर्तलें अळीनें गगन प्रासीलें रे ! ।
ज्ञान्या सुख झालें मूर्खा शिंकच पडली रे ! ।
सुख सात्विका ज्ञानदेवें निरोपिलें रे ! ॥गुरुगम्य०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP