गोविंदकृत पदें ३०८ ते ३१०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३०८ वें.
किती तरि तुज शिकबुं जाणारे मना सुजाणा ! ॥ध्रुवपद॥
श्रीगुरुपदकमल धरुनि । भक्तियोग सांग करुनि ।
वैराग्यस्थिति वरोनि । सावध गुरुचरणा ॥किति०॥१॥
सांडुनियां सर्व विषय । रघुविरपर्दि करुनि आशय ।
निरमुनि माया संशय । शाश्वतपद वरिना ॥किति०॥२॥
जोडुनि कर नमन तूज । पाहुनि घे हीतगूज ।
गोविंदालागिं उमज । दे नरहरिचरणां ॥किति०॥३॥
पद ३०९ वें.
रामचंद्रपदसरोज सेविं रे ! मना ।
त्याविरहित अन्य नसो चित्तिं कामना ! ॥ध्रुवपद॥
रघुविरपाकमल विमल । वज्रांकुश चिन्ह सव्ळ । हळ हळ दुर करुनि सकळ । ध्यायीं हृदयीं वज्रपंजरा ।
कपिध्वज ध्यानीं आणि त्या सीतवरा । दुस्तर भवसिंधु पार होईं पामरा ॥राम०॥१॥
जो दशमुखदर्पहरण । निशिदिनिं करीं हेंचि स्मरण । अर्चुनि सुख घोष करुनि गाइं त्या कपींद्रकेतना ।
दशरथप्रभुतनय दूर करिला यातना ॥राम०॥२॥
श्रीमद्रुरु नृसिंह । अरिमदगजदमन सिंह । स्मरहरप्रियकर या भुवनसुंदरा ।
निजपदीं स्थापियलें शक्तिकंदरा । तत्पदसुख दे गोविंद या नरा ॥राम०॥३॥
पद ३१० वें.
काय सांगूं सामर्थ्य हनुमंताचें ! ॥ध्रुवपद॥
मातें अंजनीच्या कुशी जन्म घेतां ।
क्षुधानळें व्यापिलें रामदूता ।
फळें आणायालागुनि गेली माता ।
तेव्हां हृदयीं आठविलें श्रीरघुनाथा ॥काय०॥१॥
उदयी बिंव आरक्त दिसे रवी ।
कोमलनेत्रीं तेजाची आभा भावी ।
फळ म्हणोनि उडाला त्यातें सेवी ।
काय सांगूं अद्धुत बळाची ठेवी ॥काय०॥२॥
ग्रहणी राहू ताडिला सव्य हातें ।
बळ सामर्थ्य दिधलें सीताकांतें ।
युद्ध केलें शचीच्या प्राणनार्थें ॥काय०॥३॥
पक्षपात करनी सुग्रीवाचा ।
मित्र केला मित्रात्मज राघवाचा ।
रणीं मर्दिला आत्मज मघवाचा ।
रजाअ केला वाळीच्या बैभवाचा ॥काय०॥४॥
सीताविरहें व्याकुळ रामराणा ।
शुद्धिसाठी प्रयत्न केले नाना ।
पुढें देखिला तो अंजनीचा तान्हा ।
नेत्र लावुनि राघवा आणी ध्याना ॥काय०॥५॥
आज्ञा होतां मुद्रिका घाली बोटीं ।
गगनमार्गे उडाला ऊर्ध्वद्दष्टी ।
सागर लंघोनि उतरला लंकावेटी ।
लंका देवी ताडितां झाली कष्टी ॥काय०॥६॥
दिव्यवनीं शिंशुपावृक्षातळीं ।
आदिमाता देखिली भद्रकाळी ।
सद्बावेंसि वंदिली जनकबाळी ।
तृतीय भाग लंकेची केली होळी ! ॥काय०॥७॥
जंबुमाळी माउनि अक्षयातें ।
रात्रिंचर बहु पावले क्षयातें ।
ब्रम्हा पत्र दे कर्तृत्वा साक्षियातें ।
विजयी भेटों आला रामरायातें ॥काय०॥८॥
सहसेनेसि मारुनि दशकंधरा ।
राज्य दिलें तयाच्या संदोदरा ।
अयोध्येसी आणिले रघुवीरा ।
वांचविलें भरतराजेश्वर ॥काय०॥९॥
राम म्हणे ऐका हनुमंता ।
चिरंजीव हो तव तनु आतां ।
अति संकटी सांभाळी माझ्या भक्ता ।
गोविंदाचा नरहरी सौख्यदाता ॥काय०॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP