गोविंदकृत पदें २३६ ते २३७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असूनगोविंदकृत पदें २३५ ते २३८ लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २३६ वें.
उद्धवा ! हरीसि मात हेचि जाणवा ।
होति विकळ प्राण गोपिचे रमाधवा ! ॥ध्रुवपद.॥
कुंदरदन मदनतात, सज्जनजन हृदयि ध्यात ।
सुरवर नर किन्नर, गुणगंभिर, मुरलीधर, घनश्याम सुंदरा ।
निशिदिनिं मनिं ध्यास, दाखवा रमावरा ! ।
कमलायतलोचन हरि आणि मंदिरा ॥उद्धवा०॥१॥
धरुनि करी गोपिकांस, कुंजवनीं आसपास ।
रासभुवनिं रतिविलास, हांसतसे वदन चुंबुनी ।
सोडिनाचि देह घरी द्दढ अकर्षुनी ।
तो प्रभु आम्हांस दाविं आजि भूवनीं ॥उद्धवा०॥२॥
गोंचिद प्रभु दयाळ नरहरि गोकूलपाळ ।
पाळुनि लडिवाळ विरह शांतवुनी आळ पूरवा ॥
उद्धवा हरीस सांग गोपि ऊरवा ।
दर्शन देऊनि त्यासि प्रेम वाढवा ॥उद्धवा०॥३॥
पद २३७ वें.
उद्धवा ! तुम्ही मथुरेला जाउनि सांगा ।
प्राणसख्या अंतरंगा ! ॥ध्रुवपद.॥
उद्धवा ! स्वकीय आशा सोडुनि पायीं ।
रतलें मन करुं मी कायी ? ॥
उद्धवा ! रयनदिन चैन पडेना देहीं ।
विरहाग्नि पेटला देहीं ॥
उठाव ॥ उद्धवा ! हरिविरहानें जाइन भंगा ॥प्राण०॥१॥
उद्धवा ! रुमुनि बसतां मी धांवुनि यावें ।
सप्रेमें चुंबन ध्यावें ॥
उद्धवा मधुर वचनें मानस निववावें ।
उचलुनि मज कडिये घ्यावें ॥
उठाव ॥ उद्धवा ! विमलपंकजकर लावि ममांगा ॥प्राण०॥२॥
उद्धया ! क्षणक्षणा हात ठेवुनी कुरळी ।
सरसावि अलक वनमाळी ॥
उद्धवा ! लक्षुमीहृदय करें ज्या कवळी ।
तो कर माझ्या हृत्कगळीं ॥
उठाव ॥ उद्धवा ! कुंजकाननि करि रासप्रसंगा ॥प्राण०॥३॥
उद्धवा ! कृपा करुनी गुरुनरहरिराया ।
भेटविं मज यशोमतितनया ॥
उद्धवा ! नमन माझें की तुमचे पायां ।
दुस्तर भवसिंधु तराया ॥
उठाव ॥ गोविंद प्रार्थना करि मुखिं गात अभंगा ॥प्राण०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP