गोविंदकृत पदें २४१ ते २४४
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २४१ वें.
श्रीरामा । सज्जनमनोभिरामा । योगीमनविश्रामा । सगुणा मेघश्यामा ।
कामादिक रिपुदमना शमना भवभय हे सुखधामा ! ॥ध्रुवपद.॥
त्राता । तुजवांचुनि मज आतां । न दिसे रे रघुनाथा । तारी दिनजन भ्राता ।
त्वत्पदरजस्पर्शे उद्धरिली गौतमक्रषिची कांता ॥श्रीरामा०॥१॥
तारीं । दुस्तर या संसारीं । दुर्मति माझि निवारीं । ऐकें दशवदनारी ।
शरणागतवत्सल ब्रिद पार्यी, गर्जति सज्जन सारी । ॥श्रीरामा०॥२॥
दासौ । स्तवि जेदिव्यपदासी । न करीं वृत्ति उदासी । दे सुख गोविदासी ।
तूं गुरुनाथ नरोत्तम तारक अंतरसदनविलासी ॥श्रीरामा०॥३॥
पद २४२ वें.
झडकरि येईं रामा । मुनिविश्रामधामा ! ॥ध्रुवपद.॥
जानकीसौभाग्यवर्धन, जलजनेत्र जगत्रापालन, जगन्निवास जनार्दन प्रमु जन्ममरण निवारीं ॥झडकरि येईं०॥१॥
त्राणभूषित ध्यान करि, धनुबाण नत अभिमान धरुनि गुमान सहित दशास्य निवटुनि रक्षुनी सुरमान ॥झडकरि येईं०॥२॥
लक्ष्मणाग्रज दक्ष राक्षस शिक्षिता कोदंड दिक्षित, लक्षणार्थ अलक्ष तव पद अक्षयी अपेक्षी ॥झडकरि येईं०॥३॥
काच मनिं यमजाच दुस्तर आच चुकवि कृपाच करुनी, याचका वरदान देईं तसाच तुज गोविंद प्रार्थित प्रार्थिद ॥झडकरि येईं०॥४॥
पद २४३ वें.
करुणानिधान रामा । निजसौख्य देईं आम्हां ! ॥ध्रुवपद.॥
या संकटा निवारी । भवदु:ख सर्व हरीं ॥करुणा०॥१॥
निजरक्षका दयाळा । सीताविलासशीला ॥करुणा०॥२॥
गोविंद बद्धपाणी । ठेवी पदाब्जीं मूर्न्धि ॥करुणा०॥३॥
पद २४४ वें.
रामा ! राजिवाक्षा ! प्रभु तूं क्षेमे दे मला हो ! ।
जीव माझा तुझ्या पदीं घेतलासे लाहो ! ॥ध्रुवपद.॥
रयनदिवस मला चैन किमपि पडेना ।
झुरतसे देह माझा गति सांपडेना ।
अलक्षासि लक्ष कैसें लावुंद हें घडेना ।
गुरुकृपेवीण तुझें रूप आतुडेना ॥रामा०॥१॥
प्रवृत्तीचा योग हाचि मला गोड वाटे ।
काय करुं कर्म माझें ओढवलें खोटें ।
क्षणपल आयुष्य जातें येणें हृदय फाटे ।
न चले उपाय कांही हेंचि दु:ख मोठे ॥रामा०॥२॥
आतां कृपा करीं गुरु नरहरिराया ।
हेचिं अनिवार तुझी निरसावी माया ।
भवपुरी बुडतों काढीं धरुनियां वाहया ।
गोविंदालागोनी तुम्ही रामा उद्धराया ॥रामा०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP