गोविंदकृत पदें १८४ ते १८६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १८४ वें.
हे आदिमाया प्रणवाकार राया ! रे ! ॥ध्रुवपद.॥
इंदिरा हृन्मंदिरावरि ठेवि श्रीधर सुंदराकृति मंदिराप्रति आणिली दशकंधरा कुलनाशकारण ॥ हे आदिमाया० ॥१॥
सिद्धि घे, दुर्बुद्धितें करुणाब्धि ! तूं स्निग्धांग पाहुनि स्त्री नव्हे भ्रम यत्र भुलवी मान वचन अनुमान दूर करीं ॥
हे आदिमाया० ॥२॥
आणि तिज बहु मान देउनि ध्यान धरि अज्ञान दूर करि ज्ञानयुक्त प्रणम्य करि निज दास दीन गोविंद प्रार्थी ॥
हे आदिमाया० ॥३॥
पद १८५ वें.
सांग सुंदरी सखिये ! मंदिरीं वरलेंस कोणाला? ॥ध्रुवपद.॥
कां गे ! दुःखित, आतां शोधित उठलीस, मजकडे ।
पाहतां मोहुनी हा गेला ॥ सुंदरी० ॥१॥
उषा म्हणे आज चार प्रहर। जवळी होते प्राणेश्र्वर ।
रूप तयाचें अति सुंदर। गे ! सखयाला ॥सुंदरी० ॥२॥
बोलुनि बाला मूर्च्छित पडली गोंविंदाचें अनुपद सरलें ।
दासीनें त्या सावध केलें शिंपुनि उदकाला. ॥ सुंदरी० ॥३॥
पद १८६ वें.
आवडतो मनीं वर मजप्रती ।
बैसले उदंड पुंड भूप मुंड त्यांत चडकीर्ण तोचि रघुपती ॥ध्रुवपद.॥
कोंवळी तनू मदनपूतळा ।
पाहिलें म्यां आज द्धषिराजयांत साज करुनि माज बांधि सहज आंवळिला ॥
किरिट कुंडले कस्तुरी टिळा ।
चमकतो सुरंग रंग जालें दंग गुंग चित्त रंगभूमीस फांकती कळा ॥
माळ घेउनी उभी ते सती ॥ बैसले० ॥१॥
मैथिलाधिपें पैज घालुनी ।
पाहतो प्रताप बाप आणुनी काप चाप दाप अपघाली भूप जाउनी ॥
रामरूप हें रेखिलें मनीं ।
मंडपांत मात करुनि बैसलासे तांत संशयांत चित्त साजणी ॥
पर्वतापरी धनुष्य आंगणी ।
राम सकुमार फार हरचाप सारसार भंगणार कोण या जनीं ? ॥
इच्छिल्या वरा देईं भगवती ! ॥ बैसले० ॥२॥
गर्व रावणें करुनि ते क्षणीं ।
धनुष्यासि त्राण बाण वाण घेउनि अपमान म्लान होउनि पडे मेदिनी ॥
कलहमूळ हें बोलती मुनी ।
घनश्याम राम सिद्ध काम जगीं नाम करी श्याम वामहस्त लावुनी ॥
ओढि त्र्यंबका कार्यसाधनीं ।
भंगियलें धनुष्य कडड तडड तडउ झडड झडड लघु किंकिणी ॥
सर्व नरपती चकित पाहती ॥ बैसले० ॥३॥
देव स्वर्गिचें पुष्प वर्षती ।
दुर्जनास भयत्रास श्र्वास दानवांस भक्तदास परम हर्षती ॥
जिवीं तोषती कनक सुमती ।
स्वामि ते वसिष्ठ शिष्ट ज्ञानदृष्ट तिष्ठ इष्ट देवता सदैव स्थापिती ॥
गोविंदरावजी यश वर्णिती ।
साधिला त्वरा वरा तो नोवरा धरामरांस लग्नसमयीं द्रव्य अर्पिती ॥
नेम नेमिला वाल्मिकें मती ॥ बैसले० ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP