रामकविकृत पदें ७४ ते ७६
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ७४ वें.
गुरु महाराजें महाराजें । अद्धुत ऐसें केलें ॥ध्रुवपद.॥
दातारें मस्तकिं ठेवुनि कर । वारियला जन्म घोर ॥गुरु०॥१॥
अध्यात्मविद्येचा उपदेश केला । देहध्यास सर्व गेला ॥गुरु॥२॥
निजरूप कैवल्य दाखविलें डोळां । तेथें मना लय जाला ॥गुरु०॥३॥
हरिची स्मृति हृदयीं प्रकाशली । द्वैताद्वैत ना राहियली ॥गुरु०॥४॥
राम म्हणे आतां गुरुसि शरण । निजानंदें परिपूर्ण ॥गुरु०॥५॥
पद ७५ वें.
ब्रम्हासुखा करिसि तळमळ । शरण जाईं संतां एक वेळ ॥ध्रुवपद.॥
अहंममता विषयकरीं विसर । ब्रहास्मिचा नित्य करीं स्मर. ॥ब्रम्हा०॥१॥
प्राणापान समते ईश्वर बरी । येणें संचित क्रियमाण भस्म करी ॥ब्रम्हा०॥२॥
ज्ञान वैराग्य क्रियानिरहंकृति । प्रारब्धभोग कृष्णार्पन होती ॥ब्रम्हा०॥३॥
बुद्धिनेत्रें निजरूप पाहीं । तेणें मुखें सुखरूप होईं ॥ब्रम्हा०॥४॥
राम म्हणे संतमहिमा अपार । म्हणउनि गुरुचरणीं जालों स्थिर ॥ब्रम्हा०॥५॥
पद ७६ वें.
सतत प्रेमें करि कृष्णस्मरण । त्यासि कधीं नसे जन्ममरण. ॥ध्रुवपद.॥
श्यामतनु सुंदर कमलनयन । कंठीं वैजयंती शोभायमान ॥सतत०॥१॥
कौस्तुभसहित कासे पीतांबर । माथां मुगुट मुरली मनोहर ॥सतत०॥२॥
कर्णीम कुंडलेम तिलक केशर । पायीं नेपुरे बाजती झणकार ॥सतत०॥३॥
ऐसा गोपाळ पाहिला यमुनेतीरीं । भक्त भजती त्यांचे भबभय हरी ॥स०॥४॥
निर्गुण अगुण अवघा हाचि देव । राम म्हने माझा चरणी भाव ॥सत०॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP