रामकविकृत पदें १३४ ते १३५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १३४ वें.
आंवरी अपुला हरी । यशोदे ! आंवरीं अपुला हरी ॥ध्रुवपद.॥
तडतडतदतड मला झोंबतो दहिंदुध अवधें हरी ।
दिसतो लहानापरी । यशोदे ! ॥
काळी कांबळी काळी रात्र अंधारीं येतों माझे घरी ।
निजलीं मी सेजेवरी । यशोदे ! ॥
हळू हळू हळू हळू हाहि सांवळा हात ठेवी माझे उरीं ।
चाल ॥ दचकुनी उठली खरी । यशोदे ! ॥
तळमळ मम अंतरी यशोदे ! ।
चोर म्हणुनि घाबरी । यशोदे ! ॥
म्हणे ‘मी’ धिटाचेपरी । यशोदे ! ॥
टीप ॥ ‘उगि उगि उगि उगि मला दटावितो अशी करि सोदेगिरी ॥१॥
फण फण फण फण सदा सासूबाई करिती आम्हांवरी ।
नाहीं सुख आम्हां घरीं । यशोदे ! ॥
मर मर मर मर जिणें आमुचें आलें या संसारीं ।
जाऊं सोडुनियां नगरी । यशोदे ! ॥
काय काय काय काय कोठें गेल्यानें मिळणार नाहीं भाकरी ।
कोठें फिर्याद जावी तरी । यशोदे ! ॥
तुम्ही तुम्ही तुम्ही तुम्ही अहा पाटील वसले डोईवरी ।
वय झालें म्हातारी । यशोदे ! ॥
सांड सांड सांड सांड काळें कारटें कौतुक वाटतें भारी ।
चाल ॥ आतांसी नवी वैखरी । यशोदे ! ॥
किति बडबड करणें तरी । यशोदे ! ॥
तुज द्रव्याची भरभरी । यशोदे ! ॥
जाती उग्याच बोलून घरीं । यशोदे ! ॥
टीप ॥ नको नको नको नको रागें भरुं सुधी रम विनंती करी. ॥२॥
पद १३५ वें.
संतो ! खूव समजना जी ! सबकी लालच त्यजना जी ! ॥ध्रुवपद.॥
हड्डी गोस्त लव मल मुतर दुर्गंध बीच जमाया ।
उप्पर तो चमडेसे लपटा सुंदर करके दिखाया ॥संतो०॥१॥
तरी पगरी भो चमरो रे घन कामा न बढाया ।
आखर सबही त्यजके जाकर आपही जंगल सोया ॥संतो०॥२॥
एक तनूकी खाक भयी तद दुजा जनाही लिया ।
लछ चौर्यासी योनी फिर फिर अपना हित नहिं किया ॥संतो०॥३॥
मै मै सबही कहते फिर मै कोन ये भेद नही पाया ।
राम कहे गुरु दयाल मिल गये उन्हे मरम बताया ॥संतो०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP