कृष्णदासकृत पदें ३५ ते ३७
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ३५ वें.
न्हाणीं न्हाणीं त्या निर्मळातें न्हाणीं ।
गंगा चरणीं त्यावरि मी घालीं पाणी ।
भाव नंदची, हे भक्ति यशोदाराणी ।
न माय गगनीं पायावरी चक्रपाणी हो ! ॥ध्रुवपद.॥
ज्याच्या स्नेहें देहबुद्धिविरहित केलें ।
ज्याच्या स्नेहें देहचें मीपण गेलें ।
ज्याच्या स्नेहें मन तन्मय होऊनि ठेलें ।
त्याचे मस्तकिंचें जावळ माखि तेलें हो ! ॥न्हाणीं०॥१॥
ज्याची प्राप्ति नोहे नाना अनुष्ठानें ।
सर्वथाही न लभ्य या कष्टानें ।
ज्याचे श्वासी वेदाचीं अधिष्ठानें ।
त्याचें नासिक उजळीतें आंगुळ्यानें हो ! ॥न्हाणीं०॥२॥
ज्याचे स्मरणें दोषी वैकुंठासी जाती ।
ज्याच्या धानें शिव लाभे पर विश्रांती ।
ज्यातें स्तवितां ते वेद मौनें ठाती ।
त्याचे भाळी लाविती निज चरणाची माती हो ! ॥न्हाणीं०॥३॥
कृष्णदासप्रसु पुत्रातें अवलोकीं ।
मीपण नेऊनि उपदेश केला सेखीं ।
वृत्ति बोलतां चालतां मूकीं ।
त्या कृष्णाचे न्हाणुनि कान फुकीं हो ! ॥न्हाणीं०॥४॥
पद ३६ वें.
हरि म्हणे गडियांते । हात पुसा घोंगडियांतें ।
ऐसें बोलातां कानया तें । सर्वही ते मानवती ॥ध्रुवपद.॥
पंधा बोले वचन । तरी यमुनेसि जाइन ।
जीवन अगत्य सेवीन । आपुल्या करेंकरोनियां. ॥हरि०॥१॥
सग पेंधा त्या अवसरा । वेगें आला यसुनातीरा ।
न्याहाळूनि पाहे बरा | विवसी कोठे म्हणोनि ॥हरि०॥२॥
तों यसुनाजीवना खळाळ । कानीं पेंधा ऐके तुंबळ ।
घोंगडी खालीं ठेवी ताकाळ जाळीमाझी अवळिला. ॥हरि०॥३॥
पेंधा म्हणे यमुनेसी । तूं बायको होऊनि आम्हांसी ।
हमामा आजि घालिसी । कैसी तगसी पाहूं आतां ? ॥हरि०॥४॥
जरी मी कृष्णदास असेन सत्य । तरी तुज करीन शांत ।
म्हणवूनि हमामा त्वरित । मांडियला यमुनेसीं. ॥हरि०॥५॥
पद ३७ वें.
रमाकांत न ये मी वो ! सये ! काय करुं ॥ध्रुवपद.॥
दूर करुनि चंदनासि । दाविं नंदनंदनासि ।
शशीकळा गमती रोग, नको सजणि भांग भरूं, ॥रमाकांत०॥१॥
श्रम मनिं बहु दाटताति । युगसम पळ वाटताति ।
म्लानवदन चंद्र नको दर्पणासी आणि धरूं. ॥रमाकांत०॥२॥
नवस करूनि चंडिकेशिं । दाविं मला हृषिकेशी ।
कृष्णदास विरहसिंधु सांग सखे ! केंवि तरुं ॥रमाकांत०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP