गोविंदकृत पदें १७८ ते १८०
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १७८ वें
श्रवण करा हरिकथा । कथा तुम्ही ॥ध्रुवपद.॥
धनसुतदारा मायिक सर्वही । व्यर्थ मायाजालीं गुंता ॥ श्रवण० ॥१॥
शुद्ध बुद्ध अविनाशन नामें । दूर करा भवव्यथा ॥ श्रवण ० ॥२॥
गोविंदगुण तुम्हि गाउनि । वाचे धरूनि जा ह्याचि पथा. ॥ श्रवण० ॥३॥
पद १७९ वें.
हरिविण कोणी न दिसे मजलागीं। बाई ! ॥ ध्रुवपद.॥
आसनिं शयनिं मनि कृष्ण हा भासे । त्याविण न रुचे कांहीं ॥ हरि० ॥१॥
गमनागमनीं जनिंवनिं हरि दिसतो । तन्मय झालें पाहीं ॥ हरि० ॥२॥
गोविंदप्रभु निजरूप हें बरवें । ठसलें माझे हृदयीं. ॥हरि० ॥३॥
पद १८० वें.
दीनाचा प्रभु हा कनुवाळ । दीनाचा ॥ध्रुवपद.॥
चतुर्मुखातें दर्शन दुर्लभ । तो फिरे आळोआळ ॥ दा० ॥१॥
शिववंद्या ते म्हणे यशोदा । माझा चिमणा बाळ. ॥दी० ॥२॥
अवयव नसतां सावयव होउनि । म्हणवी यशोदाबाळ ॥ दी० ॥३॥
खल अघनाशक भक्तां पोषक गोविंद षड्रिपुकाळ ॥ दी०॥ ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP