विठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद ६३ वें.
जडदेह कसा घेउनि गेला तुकाराम वाणी ॥ध्रुवपद.॥
भजन पुजन भावबळें । जिंकियले कळीकाळ ॥
गर्जताति तिन्ही ताळ । ऐकताति कानीं. ॥जडदेह०॥१॥
पंढरिचा देव गडी ॥पाववील पैल थडी ॥
विठ्ठलनाथ गरिब गडी । त्यास कोण मानी ॥जडदेह०॥२॥
पद ६४ वें.
धिग ब्रम्हाबोध करुनि काय मूढ मानवाला ॥ध्रुवपद.॥
रात्रदिवस जोडि दाम । हृदयीं वसे तंव सकाम ।
नाठवितां रामनाम । देवदानवांला ॥धिग०॥१॥
बुडतयास देउनि हात । आपापणांसि करिल घात ।
विठ्ठलनाथ देउनि लात । सोडि पालबाला ॥धिरा०॥२॥
पद ६५ वें.
मजकडे आधिं निकट करुनि येइं पांडुरंगा !॥ध्रुवपद.॥
कलियुगीं बहूत दास । होसी दासां घरीं दास ।
माझ्या आयुष्याचा नाश । जात आहे भंगा. ॥मज०॥१॥
आसनि शायनिं मनीं ध्यात । तूंचि बंधुमायतात ।
विठ्ठलनाथ रसिक गात । नाम प्रेमसंगा. ॥मज०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP