मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २२४ ते २२६

गोविंदकृत पदें २२४ ते २२६

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २२४ वें.

मजवरी कृपा करीं देवराया ! ॥ध्रुवपद.॥१॥
भक्ताची मनोवांछित सिद्धि । देईं त्वरें सुखसदया ॥मजवरी०॥१॥
दीननाथ ब्रीद तवा पायीं । सांभाळीं गुणवर्या ॥मजवरी०॥२॥
गोविंद अधम सर्वांपरि असतां । तारी भवार्णवीं सखया ॥मजवरी०॥३॥

पद २२५ वें.

गोविंदा ! रामा ! ये रे ! । गोपाळा ! रामा येई रे ! ।
गोपीमानसहंसा कृष्णा ! मजला क्षेम दे रे ! ॥ध्रुवपद.॥
यज्ञमुखी अवदान न घेतां चित्तीं विटसी कां ? रे ! ।
सान मुलें गवळ्यांची त्यांचें उच्छिष्ट खासी बा ! रे ! ॥गोविंदा०॥१॥
इंद्रादिक मुर नमिति तुजला हौनियां दीन सारे ।
तो स्तव अप्रिय मानुनि शीव्या खासी मुलांच्या कशा रे ! ॥गोविंदा०॥२॥
अति सुंदर क्षीराब्धीतनया नावडे तूज कमला रे ! ।
भाग्योदय कुब्जेचा भारी दासीसीं रमला रे ! ॥गोविंदा०॥३॥
अधमोद्धारण हें मी जाणुनि भजतों तुज सदा रे ! ।
तरि करुणा ऐकुनि दीनाची क्षेम दे गोविंदा रे ! ॥गोविंदा०॥३॥
अधमोद्धारण हें मी जाणुनि भजतों तुज सदा रे ! ।
तरि करुणा ऐकुनि दीनाची क्षेम दे गोविंदा रे ! ॥गोविंदा०॥४॥

पद २२६ वें.

रामकृष्ण बासुदेव भज मानसहंसा ।
सज्जनजनपालक सुखदायक हृद्धंसा ॥ध्रुवपद.॥
मंदस्मित कुंदरदन । मुनिजनहृत्तापकदन ।
मदनदहनप्रियकर मधुरिपु अघनाशा ॥रामकृष्ण०॥१॥
कल्पद्रुमवनविलास । कंसांतक श्रीनिवास ।
कमलाकर कंजनयन कौस्तुभमणिभूषा ॥रामकृष्ण०॥२॥
गोविंद प्रभु दयाल । नरहरी गोकुळपाल ।
गोपीक्चमंडन भवखंडन जगदीशा ॥रामकृष्ण०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP