गोविंदकृत पदें २८१ ते २८३
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद २८१ वें.
जानकीसहित राम द्दष्टि देखिला ।
भाग्योदय फार मनामाजि लेखिला ॥ ध्रुवपद.॥
दिव्य वसन केशरी पित वेष्टिला कटीं ।
हास्यवदन सुंदर अति रम्य हनुवटी ।
कमलायत नेर धनु:प्राय भ्रकुटीं ।
रत्नजडित मुगुट मस्तकी विराजला ॥जानकी०॥१॥
मुक्तकंदरांत पदकजडित शोभलें ।
तसेंच रत्नजडित स्फूर्ति कर्णि कुंडलें ।
आणिक भुजबंद कटक तेज आगळें ।
भरजरीचा जामेवार अंगीं घातला ॥जानकी०॥२॥
वामभागि ती विदेहराजकूमरी ।
नेसली पटकूळ वसन पल्लवी जरी ।
आभरणें मंडित तनु सान गोजरी ।
एकावळि मुक्तचंद्रहार शोभला ॥जानकी०॥३॥
सिंदुर नग मस्तकिं रघुनाथ राउळी ।
सन्मुख सौमित्र वीर तो अतुर्बळी ।
शक्रारि प्रबळ शत्रु मिळविला धुळी ।
सुंदर निलरत्नकांति तो विलोकिला ॥जानकी०॥४॥
लक्ष्मणाग्रभागिं आंजनेय तो उभा ।
सिंदुरचर्चित बालसूर्यसमप्रभ्रा ।
दशमुख बलदर्प हरुनि विटंबिली सभा ।
दास गोविंदास महल्लाभ लाभला ॥जानकी०॥५॥
पद २८२ वें.
तुजवर आम्ही फिदा बोल एकदा पद्मलोचने ! ।
मुनिमानसप्रियकरे ! नंदकुमरे शुभलक्षणे ! ॥ध्रुवपद.॥
पीतवसन परिधान कोरतगटी त्यावर भरजरी ।
खंख्याचें कटिसूत्र जडित नवरत्न नितंबावरी ।
बहु नादर वय तरुण ठेंगणी असे गोजरीं ।
कटिकर निट बाहुले उभी खुब नटुन भिवरातिरीं ॥
चाल ॥ राजसे ! ग ! कैकांचे मन मोहिलें ।
राजसे ! ग ! हे प्राण पदीं वाहिले ।
राजसे ! ग ! पंढरिस तुला पाहिलें ॥
टीप ॥ तुझें ध्यान लागलें विकळ जीव होत असे साजणे । मुनि०॥१॥
नरम गाल रेशमी, चुबुक हनुवटी कपोल चांगली ।
कुंदरदन सुख सघन दिठी नासाग्रीं असी पाहिली ।
दिव्य मकरकुंडलें हिन्यांची गंडी प्रभा फांकली ।
रसभर मुखीं तांबूल अधर सुरंग रंगली विडी ॥
चाल ॥ राजसे ! ग ! सुवास गुंतला गुंतला असे ।
राजसे ! ग ! तनुतेज फांकलें दिसे ।
राजसे ! ग ! तुज पाहतां मन हें पिसें ॥
टीप ॥ नसे भाग्य, मज असे प्रीति माझी, तुजला गवसने । मुनि०॥२॥
ध्रुव नारद प्रन्हाद व्यास शुकसनकादिक ते भले ।
कर जोडुनि प्रार्थितां तुला पाहुनि सब्घ राहिले ।
निज सुकृत धन पदरी घेउनि उगे उभे राहिले ।
तें ठाकुनि तुज कसे प्र्यकरे ! गवळी इष्ट वाटले ? ॥
चाल ॥ राजसे ग ! उच्छिष्ठ मुखीं घालसी ।
राजसे ! ग ! तसंगें ताख तूं पिसी ।
राजसे ! ग ! धांवून गुरें वोळसी ॥
टीप ॥ कडकडोनि झोंबसी गळां पडसी घेसी चुंबनें ?। मुनि०॥३॥
अंगिकार करिसी न करीसी हेंचि दु:ख वाटतें ।
वियोगाग्नि जाळितो तुझा, मम प्रेम हृदयि दाटतें ।
आलिंगावें तुला वदन चुंबाया मन ऊठतें ।
प्रेमाश्रु हे स्रवती लोचनी वदनिं येति वाटतें ॥
चाल ॥ राजसे ! ग ! मी दीन प्रार्थितो तुला ।
राजसे ग ! मी दीन प्रार्थितों तुला ।
राजसे ! ग ! मी दीन प्रार्थितों तुला ।
राजसे ग ! गोविंद म्हणविं आपुला ।
राजसे ! ग ! निजपदिं गति देईं मला ॥
टीप ॥ जसा छंद लागला रूपाचा तोचि सखे ! पुरवणें । मनि०॥४॥
पद २८३ वें.
दंडधर प्रचंड भय अखंडवारका ।
तांडवाधिशा नतास सौख्यकारका ॥ध्रुवपद॥
पंचवदन मदनदहन, त्रिपुरमर्दना ।
नंदीवाहन मुनिजनमनवर्धना ।
नागभूष्ण वसनरहित प्रभु जनार्दना ।
काशिप्रौनिवास जगदंतकारका ॥दंड०॥१॥
दिव्य पतितपावन हें ब्रिद पदीं असे ।
पूर्वि पतित तारियले म्हणुनि मज पिसें ।
लागलें परंतु यत्न न चले करुं कसें ।
तूं कृपा करुनि मज दिनास तारका ॥दंड०॥२॥
जोडुनि कर नमन तूज हे दयानिधी ! ।
पळ पळ आयुष्य गत, नसेचि आवधी ।
षडरिपु अति कष्ट दुष्ट देति मंदधी ।
दीन गोविंददास यासि पाळका ॥दंड०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP