श्यामसुंदरकृत पदें १७ ते १९
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १७ वें.
मन माझें रामपदीं जडलें ॥ध्रुवपद.॥
माशी मधासिं लुब्धुनि राहे । या न्ययें गमलें ॥मन०॥१॥
कमळिणीशीं भ्रमर जैसे । सुगंधा भुलले ॥मन०॥२॥
श्यामसुंदर जिवलग म्हणे । रामपदीं मन रमलें ॥मन०॥३॥
पद १८ वें.
प्राण्या ! तू ऐसा व्यापार करीं ।
जेणें मुदला नये हारी ॥ध्रुवपद.॥
पंढरीपेठ्शीं घातलें. विठ्ठल सौदागरी आले, संत ।
शेटे पुंडलिक कउला दिला खेप आली नामवस्त ॥
ग्राहक भक्त तिथें जन येती तागडी घेऊनि सत्य ।
मनाचा विसार देऊनि मग ते मापाशीं बैसले संत ॥प्राण्या०॥१॥
भक्तिप्रेमभावें भरितां भरोनी स्वस्तूनें अभर झाला ।
तव तेचि वस्तूची तुरतुर झाली, नफा लक्षगुण आला, ॥
एकेचि खेपेनें दारिद्र फिटलें जन्मोजन्मीं भाग्य त्याला ।
भाम्डवल ज्याचें पैसे वित्त होतें त्याचाची व्यापार झाला ॥प्राण्या०॥२॥
तयाचे देखो वेगीं अभक्त गेले नाहीं पदरीं संचित नाणें ।
व्यापार करितां तोटाची आला, तस्करीं लुटिलें केणें ॥
नफ्यासहित मुद्दल गेलें. अधीक झालें ऋण ॥प्राण्या०॥३॥
धन्य धन्य संचीत पूर्व पुण्य म्हणवुनी हा जन्म झाला प्राप्ती ॥
खरें खोटें येथें निवडोनी घ्यावें. आली हरिभक्ती ।
श्यामसुंदर जिवलग बोले असत्य नावडे चित्तीं ॥प्राण्या०॥४॥
पाद १९ वें.
रामचंद्र महाराज । जय जय रामचंद्र महाराज ॥ध्रुवपद.॥
द्रुपदसुताकू चीर बढायो । कियो भक्तनके काज ॥
राजा वभीखन लंका पाये । बडे गरीब नवाज. ॥राम०॥१॥
दैत्यकुमरका मान राखियो । गजेंद्र पशुकी लाज ॥
गणिका पतित उधारे । किये भक्तनके काज. ॥राम०॥२॥
सुदामजीने चुडवे दिये । वाकू किये सिरताज ॥
नाम तुम्हारे यहि एक जानो । तालबिना पखवाज. ॥राम०॥३॥
श्यामसुंदरकू तुमविन कौ । नहीं और न जी रघुराज ! ॥
दो कर जोरे बिनति करत हूं । राखो मेरी लाज. ॥राम०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP