पद २७८ वें.
आठविला श्रीराम । हृदयी. ॥ ध्रुवपद.॥
भक्तकामकल्यद्रुम राघव । तारक ज्याचें नाम ॥हृदयीं०॥१॥
गरळानळें जाचतसे देहीं । शिव झाला आराम ॥हृदयीं०॥२॥
राजीवाक्ष सगुण सुखदायक । पूर्ण करी मनकाम ॥हृदयीं०॥३॥
गोविंदप्रसु तारक मोठा । स्मरतां ज्याचें नाम ॥हृदयीं०॥४॥
पद २७९ वें.
राघव आणा रे आणा रे ! राधव आणा रे ॥ ध्रुवपद.॥
त्याविण पळ युगसम मज जाती । कर्मगतीने पडली भ्रांती ।
ज्यातें योगी पाहती अनुदिनी ध्याना रे ॥राघव०॥१॥
भक्तजनांचा प्राणविसांवा । सीताहृत्पंजरींचा रावा ।
शरणागतास रक्षी देउनि माना रे ! ॥राघव०॥२॥
श्रीमत्सद्नुरुनाथ नरोत्तम । निजदासा निज्पद दे उत्तम ।
गोविंदाला दावा त्याचे चरणां रे ॥राघव०॥३॥
पद २८० वें.
काधि पाहिन मी श्रीराम, योगिविश्राम, भक्तसुखधाम, नेत्रकमळीं ।
शिर ठेविन तत्पदकमळीं । सद्भावें. ॥ ध्रुवपद.॥
अरुणापरि पर आरक्त, ध्वजांकुशयुक्त, ध्यातसे भक्त, सदा हृदयीं ।
पाहतां अप्रतिम सुख देःईं ॥सद्भावें॥
पतितोद्धारण ब्रिद त्यांत, सकळ भुवनांत, गर्जतो सत्य, निगम ग्वाही ।
ऐकिलें सर्वांठायी ॥सद्धावें॥
गंगायमुना विधिसुता, रमति निजहिता, जनकदुहिता, नमितां पायीं ।
आनंदयुक्त वैदेही ॥सद्भावें॥
नग सोज्ज्वळ चंद्राकार, बहुत अरुवार, पाहतां मनोवृत्ति रमली ।
शिर ठेविन तत्पदकमळीं ।सद्भावें॥कधिं०॥१॥
सिंहासम कटि सान, गोजिरें ठाण, पीतांवर वेष्टित जरितगटी ।
शार्ड्ग धरिलें मुष्टीं ॥सद्धावें॥
नाभिपंकज लहान, सुखाचें त्थान, त्यांत उद्धवला परमेष्ठी ।
जानें निर्मिली सर्व सृष्टि ॥सद्धावें॥
वक्ष:स्थळ अति विस्तीर्ण, वत्सलांछन, श्रीनिकेतन, पाहतां द्दष्टीं ।
आनंद न माये पोटीं ॥सद्धावें॥
गजशुंडापरि भुजदंड, असे प्रचंड, कुंडलें शोभति कर्णपुटीं ।
आरक्त विडा अधरोष्टी ॥सद्धावें॥
नासिकातिलपुष्पारी, तिलककेशरी, विडा रसभरीत वदनकमळी ।
शिर ठेविन तत्पदकमळी ॥सद्धावें॥कधिं०॥२॥
मस्तकीं नवरत्नें जडित, शोभतो मुगुट, प्रभेचा थाट, अलयीं विलसे ।
उतरी भर्जरिचि दिसे ॥सद्धावें॥
वामांगीं सीताशाक्ति, तरुण आकृति, अलंकाराची दीप्ती असे ।
जगज्जननी भु शोभतसे ॥सद्धावें॥
गौरांगीं शार्दुलकटी, वरी पीतघटी, चुबुक हनुवटी, तयेवरता निळबिंदु असे ।
कुकुम निढळी विलसे ॥सद्धावें॥
सुमंतादिक प्रधान, सभासद मान्य, पुढें हनुमान, उभा असे ।
लागलें स्वरूपाचें पिसें ॥सद्धावें॥
नरहरि सद्नुरुमहाराज, पुरवीं मनकाज, दास गोविंद प्रतिपाळीं ।
शिर ठेविन तत्पदकमळीं ॥सद्धावें॥कधि०॥३॥