श्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८
पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.
पद १५५ वें.
रामोदरीं जग, हृदयातरीं । राम तुम्ही काम वळखाना ? ! ॥ध्रुवपद.॥
नग कनकाचें. कनक नगीं पहा । ‘अतर्बहिश्च’ श्रुतिवचना. ॥राम०॥१॥
आवरीवर्ति ‘भुवनेष्वंत:’ श्रुति । आंत खालींवर एक जाणा. ॥राम०॥२॥
राजस तामस सात्विक राघव । ममैवांशो’ हरिवचना. ॥राम०॥३॥
श्यामात्मज वदे वेदलिखित खत । संत पंडित साक्ष ध्याना. ॥राम०॥४॥
पद १५६ वें.
राम जर्गीं भरला । अनुभव वेद वदे भरला. ! ॥ध्रुवपद.॥
चार दहा एक पांच मिळोनी । पाहतांची सरला. ॥राम०॥१॥
पंचक टाकुनि चौदा घेउनी । एक असे विरला. ! ॥राम०॥२॥
तुंडा जिनाविण घोडा पिटवुनी । संतांहीं धरला. ॥राम०॥३॥
श्यामात्मज म्हणे हेंपद जाणिल । तोची भव तरला. ॥राम०॥४॥
पद १५७ वें.
बाई ! मी पिशी झाली ग ! ना पोरी एक सुत व्यालें ग ॥ध्रुवपद.॥
जुना ठेवणा बहु दिवसांचा । नवरा त्यासी मी भ्यालें ग ! ॥बाई०॥१॥
चोखट पाहुनि पाट लाविला । परपुरुषासी भ्यालें ग ! ॥बाई०॥२॥
काजळ कुंकूं लावुनि डोळां । हळद वांटुनि प्यालें ग ! ॥बाई०॥३॥
चुडा फोडुनि नवरगाचा । उभी नभी मी नाहलें ग ! ॥बाई०॥४॥
घोंगड वाणी ऐकुनि कानीं । श्यामसुता ह्सूं आलें ग ! ॥बाई०॥५॥
पद १५८ वें.
अशानें मिळेल तुला हरि काय ? ! ॥ध्रुवपद.॥
बहुविध दोषां नित्यनूतन करी । स्वकृत सुकृत गाय. ॥अशानें०॥१॥
निर्घृण निंदक कपटि अधार्मिक । वदत परासी न्याय. ॥अशानें०॥२॥
वस्त्राभरणें सुशोभित कांता । निर्वसनें फिरे माय. ॥अशानें०॥३॥
श्यामात्मज म्हणे जन भोंदाया । वरवर हरिहर गाय. ॥अशानें०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP